Friday, January 14, 2011

अनिल अंबानींना 'सेबी'चा धक्का


परकीय गुंतवणुकीतील अनियमिततेबद्दल 'सेबी'ने अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रा' व 'रिलायन्स नॅचरल रिसोर्स लिमिटेड'ला शुक्रवारी दणका दिला. संपूर्ण वर्षभर या कंपन्यांना शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यास 'सेबी'ने प्रतिबंध केला आहे. तसेच व्यक्तिश: अनिल अंबानी, रिलायन्स इन्फ्राचे उपाध्यक्ष सतीश सेठ व तीन संचालकांवरही ही बंदी लागू असेल. तसेच याप्रकरणाच्या चौकशीसाठी 'सेबी'ला आलेला ५० कोटींचा खर्चही कंपनीकडून वसूल करण्यात येणार आहे.

0 comments:

Post a Comment

 

Its all media. Copyright 2008 All Rights Reserved Revolution Two Church theme by Brian Gardner Converted into Blogger Template by Bloganol dot com