एरवी पोलिसांची पायलट जीप , पक्षाचे आमदार , नगरसेवकांच्या गाडयांच्या ताफ्यात फिरणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी चक्क लोकलने प्रवास केला. डोंबिवलीत नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर मुंबईत परततांना त्यांनी डोंबिवली- दादर ही फास्ट लोकल पकडली आणि तब्बल 25 वर्षांनंतर लोकल सफर केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांची बैठक घेण्यासाठी राज ठाकरे सोमवारी सकाळी मुंबईहून डोंबिवलीपर्यंत लोकलने येणार असल्याची चर्चा रविवारी सुरु होती. मात्र संध्याकाळी अचानक बेत बदलला आणि बैठकीनंतर मुंबईत परततांना लोकलने प्रवास करण्याचा निर्णय झाला. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी डोंबिवलीत प्लॅटफार्म क्रमांक 5 वर आलेली फास्ट लोकल राज ठाकरे यांनी पकडली आणि फर्स्ट क्लासमधून त्यांनी दादरपर्यंत प्रवास केला.
बैठकीनंतर डोंबिवली जिमखाना येथे पत्रकारांशी बोलण्याचे टाळणाऱ्या राज ठाकरे यांना लोकलमध्ये पत्रकारांनी गाठलेच. रस्तामार्गे प्रवासाचा कंटाळा आल्याने लोकलने प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. परप्रांतियांच्या लोंढयांवर टीका करण्याची संधी त्यांनी यावेळीही दवडली नाही. मुंबईवर सतत आदळणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढयांमुळे सर्व यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्याचा टोला त्यांनी लगावला. प्रवाशांना आपल्या लोकल प्रवासाबाबत कुतुहल वाटत असल्याचे एका पत्रकाराने ठाकरे यांना सांगताच ‘ हा आपला पहिला लोकल प्रवास नाही आणि कॉलेज विद्यार्थी असतांना आपण दररोज लोकलने प्रवास करत होतो ’, याची आठवण त्यांनी करुन दिली. मात्र या प्रवासाला आता तब्बल 25 वर्ष उलटली आहेत.

0 comments:
Post a Comment