Monday, January 31, 2011

मराठी सिनेमांची उपेक्षा थांबवा


मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्रदशिर्त होऊ लागला तरी त्याची उपेक्षा थांबलेली नाही. मल्टिप्लेक्सचालक प्राइम टाइमला मराठी चित्रपटास स्थान देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मनसेने संबंधित व्यवस्थापनास निवेदन देऊन ही उपेक्षा थांबवा, नाही तर एकही चित्रपट प्रदशिर्त होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईमधील रघुलीला, सिटी सेंटर, पामबीच गॅलेरिया व इतर ठिकाणच्या चित्रपटगृहांमध्ये मराठी सिनेमा दाखविण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, या सिनेमांची योग्य जाहिरात केली जात नाही. चित्रपटगृहांबाहेर मराठी चित्रपटांचे होडिर्ंगही अत्यंत लहान लावले जाते. प्रेक्षकांना सोयीची नसलेली वेळ मराठी चित्रपटांना दिली जात आहे. मात्र, मल्याळी व इतर चित्रपटांना प्राइम टाइम दिला जात आहे. मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या या दुय्यम दर्जाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी संबंधित व्यवस्थापनाची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यामधील एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठीच राखीव ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

0 comments:

Post a Comment

 

Its all media. Copyright 2008 All Rights Reserved Revolution Two Church theme by Brian Gardner Converted into Blogger Template by Bloganol dot com